ज्येष्ठ अभिनेते विनय आपटे यांचे निधन

natya 300

मुंबई, प्रतिनिधी- मराठीतील लोकप्रिय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते विनय आपटे यांचे आज, शनिवारी संध्याकाळी निधन झाले. छातीत दुखत असल्याच्या कारणामुळे आपटे यांना अंधेरी येथील कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तेथेच आज त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मराठी नाट्य-चित्रसृष्टीला धक्का बसला आहे.छातीत दुखत असल्याने आपटे यांना अंधेरी येथील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात अखेरच्या क्षणी पत्नी आणि मुलगा त्यांच्या सोबत होते. आपटे यांनी टीव्ही, नाटक आणि सिनेमा या तीनही माध्यमांमध्ये काम केलं होतं. ’आभाळमाया’ ही त्यांनी दिग्दर्शित केलेली मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. आपटे यांनी ’जोगवा’, ’आई शप्पथ…!’, प्रणाली’, ’लालबाग परळ’ या मराठी सिनेमांसोबतच ’कलियुग’, ’आक्रोश’, ’चांदनी बार’, ’कौन?’, ’सत्याग्रह’, ’इट्स ब्रेकिंग न्यूज’, ’चांदनी बार’, ’एक चाळीस की लास्ट लोकल’, ’धम्माल’ या हिंदी सिनेमांमध्येही अभिनय केला होता. खर्जातला आणि धारदार आवाज हा त्यांच्या अभिनयाला आणखी बहार आणायचा.
विनय आपटे यांनी १९७४ साली अभिनयाची सुरुवात केली. केवळ एक अभिनेता म्हणून नव्हे तर दिग्दर्शन आणि निर्मितीमध्येही विनय आपटे यांनी आपला ठसा उमटवला होता. विजय तेंडुलकरांनी लिहलेल्या ‘मित्राची गोष्ट’ यासह असंख्य नाटकांचे त्यांनी दिग्दर्शन केले होते. ‘मित्राची गोष्ट’ हे व्यवसायीक रंगभूमीवरील त्यांचे पहिले नाटक होते.
‘कबड्डी कबड्डी’, ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. झी मराठी वाहिनीवरील ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकेतील त्यांचा अभिनय प्रेक्षकांना आवडला होता.
कबड्डी कबड्डी मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकाचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. झी मराठी वाहिनीवरील एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेतील त्यांचा अभिनेय प्रेक्षकांना आवडला होता.

facebooktwittergoogle_plusredditpinterestlinkedinmailby feather

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three × two =

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>

Powered by WordPress | Designed by: search engine optimization company | Thanks to seo service, seo companies and internet marketing company