IMG_20140405_1642181

रायगडात सुनील तटकरे विरुद्ध सुनील तटकरे

आ. जयंत पाटील यांचा हुकुमाचा एक्का बाहेर अलिबाग, उमाजी म. केळुसकर- शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी रायगड लोकसभा मतदार संघातील नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्याविरुद्धचा हुकमी एक्का सुनील तटकरे More »

unnamed (5)

मापगावला झाली ५०४ नेत्ररुग्णांची तपासणी

लायन्स क्लब अलिबाग-मांडवा यांचा स्तुत्य उपक्रम. अलिबाग प्रतिनिधी- लायन्स क्लब अलिबाग मांडवा यांच्या वतीने शनिवार २२ ते रविवार २३ मार्च असे दोन दिवस मापगाव येथे मोफत नेत्रचिकित्सा शिबीर आयोजित करण्यात आले होते. More »

unnamed (1)

बोर्ली समुद्रकिनारी संशयास्पद नौका!

पोलिसांत तक्रार दाखल, नौका नोंदणीकृत नसल्याची बंदरविभागाची कबुली. अलिबाग, प्रतिनिधी- मुरुड तालुक्यातील ताराबंदर बोर्ली येथील सागरपुत्र मच्छीमार सहकारी संस्थेचे चेअरमन व इतर संचालकांनी मत्स्य व्यवसाय विभागाचे अधिकारी, बंदर विभागाचे अधिकारी यांना हाताशी More »

unnamed (2)

कवी बाबू डिसोजा यांना महाराष्ट्र समाजरत्न पुरस्कार

अभिनेत्री धनश्री काडगावकर यांच्या हस्ते करण्यात आला सन्मान. खोपोली, प्रतिनिधी- पुणे-निगडी येथील कवी बाबू फिलीप डिसोजा यांनी गेली ४ दशके साहित्य क्षेत्रात कविता, कथा लिहून तसेच मुक्तपत्रकारितेद्वारे विविध वृत्तपत्रांतून जे सामाजिक कार्य More »

DSC_0341

राजिप कर्मचारी सहकारी पतपेढी सहकाराचा आदर्श

राजिप कर्मचारी पतपेढीचा साजरा झाला सुवर्ण महोत्सव. माजी चेअरमन, व्हा. चेअरमन, सेक्रेटरी यांचा केला सत्कार. माजी कर्मचारी, गुणवंत कर्मचारी यांचाही केला गुणगौरव. अलिबाग, प्रतिनिधी- रायगड जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतपेढीच्या सुवर्णमहोमहोत्सवी वाटचालीचा More »

unnamed

विराज श्रीनिवास भगत यांची बैलगाडी प्रथम

अलिबाग, प्रतिनिधी- धुलिवंदननिमित्त अलिबाग येथील कोळी समाजाने आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यतींमध्ये आवास येथील विराज श्रीनिवास भगत यांच्या गाडीने प्रथम क्रमांक पटकाविला. तर वायशेत येथील महेंद्र दळवी यांच्या गाडीने द्वितीय आणि मिळकतखारच्या शांताराम More »

western-ghats

रायगडातील २६१ गावे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील

अलिबाग, प्रतिनिधी- नैसर्गिक साधनसंपत्तीने परिपूर्ण असलेल्या व बहुजैववैविध्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या पश्‍चिम घाटास आता केंद्र सरकारने ’पर्यावरणदृष्ट्या संवेदशील’ (इको-सेन्सिटिव्ह) घोषित केले आहे. यामध्ये देशातील सहा राज्यांचा आणि महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांचा, तर रायगड जिल्ह्यातील More »

unnamed12

समाजकारण, राजकारणाची महत्वाकांक्षा हवी

चित्रलेखा पाटील यांचे महिला दिनानिमित्त प्रतिपादन. अलिबाग, प्रतिनिधी- पारंपारिक जोखडातून, समाजाच्या बुरसटलेल्या विचारसरणीतून आणि त्यायोगे येणार्‍या अनेक बंधनांतून आजची आपली पिढी बाहेर पडली आहे, किंबहूना ग्रामीण किंवा निमशहरी भागातूनही ही सुरूवात झाली आहे. More »

unnamed (2)

पेझारीला आरडीसी बँकेच्या एटीएम सेवेचे उद्घाटन

अलिबाग, प्रतिनिधी- आर.डी.सी.ने चांगले काम केले. स्व. प्रभाकर पाटील असते तर त्यांनी समाधान व्यक्त केले असते. बँकेने गरिबांचा पैसा सुरक्षित ठेवण्याचे काम केले आहे. बँकेला सर्वोच्च पुरस्कार मिळाले ही आ. जयंत पाटलांची More »

unnamed

प्रभाकर पाटील यांची १४ वी पुण्यतिथी साजरी

अलिबाग, प्रतिनिधी- रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षा स्व. प्रभाकर पाटील यांची १४ वी पुण्यतिथी अलिबागेत साजरी करण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघामध्ये अध्यक्षा सुप्रिया पाटील More »

साप्ताहिक कोकणनामा, १० एप्रिल २०१४

Page_1

Page_1

Page_2

Page_3

Page_4

 

रायगडात सुनील तटकरे विरुद्ध सुनील तटकरे

IMG_20140405_1642181

आ. जयंत पाटील यांचा हुकुमाचा एक्का बाहेर
अलिबाग, उमाजी म. केळुसकर- शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी रायगड लोकसभा मतदार संघातील नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्याविरुद्धचा हुकमी एक्का सुनील तटकरे या नावाचाच असल्याचा शनिवार, ५ एप्रिल रोजी गौप्यस्फोट केला. मात्र हा हुकुमी एक्का डमी उमेदवार नसून राष्ट्रवादी पक्षाचा अस्सल उमेदवार आहे. त्याचे नाव सुनील शाम तटकरे असून ते श्रीवर्धनचे मूळ रहिवासी असून त्यांचा मुंबई-नालासोपारा येथे वडापावचा व्यवसाय आहे. नव्या राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे खर्‍या अर्थाने आम आदमी उभा राहिला असल्याने नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टीचे उमेदवार सुनील दत्तात्रेय तटकरे यांच्या मतांची कशी विभागणी होते, हा या निवडणुकीतील औत्सुक्याचा विषय असणार आहे. यात आणखी गमतीची बाब म्हणजे नव्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची शेकापशी मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. मात्र नव्या राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शेकापची नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टीबरोबरची त्वेषाची लढत सुनील दत्तात्रेय तटकरेंना धूळ चारण्यासाठी असणार आहे. पण या लढतीत कोण शिरजोर होतो, कोण रायगडचे दिल्लीत प्रतिनिधीत्व करणार याव २४ एप्रिल रोजीच शिक्कामोर्तब होईल.

साप्ताहिक कोकणनामा, २७ मार्च २०१४

Page_1

Page_1

Page_2

Page_3

Page_4

 

मापगावला झाली ५०४ नेत्ररुग्णांची तपासणी

unnamed (5)

लायन्स क्लब अलिबाग-मांडवा यांचा स्तुत्य उपक्रम.
अलिबाग प्रतिनिधी- लायन्स क्लब अलिबाग मांडवा यांच्या वतीने शनिवार २२ ते रविवार २३ मार्च असे दोन दिवस मापगाव येथे मोफत नेत्रचिकित्सा शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात तज्ज्ञ नेत्रचिकित्सकांकडून ५०४ नेत्ररुग्णांची तपासणी करण्यात आली.

बोर्ली समुद्रकिनारी संशयास्पद नौका!

unnamed (1)

पोलिसांत तक्रार दाखल, नौका नोंदणीकृत नसल्याची बंदरविभागाची कबुली.
अलिबाग, प्रतिनिधी- मुरुड तालुक्यातील ताराबंदर बोर्ली येथील सागरपुत्र मच्छीमार सहकारी संस्थेचे चेअरमन व इतर संचालकांनी मत्स्य व्यवसाय विभागाचे अधिकारी, बंदर विभागाचे अधिकारी यांना हाताशी धरून मच्छीमारांना डिझेल सवलतीमध्ये मिळणार्‍या अनुदानामध्ये कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल असण्याच्या पार्श्‍वभूमीवर बोर्ली येथील समुद्र किनार्‍यावर सात ते आठ अपरिचीत नौका होड्या आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली असून सदर नौकांची तपासणी करून त्या नौकांची कागदपत्रे कायदेशीर नसल्यास सदरच्या नौका जप्त करण्याबाबत अजय उर्ङ्ग राजू भोईर यांनी पोलीस अधीक्षक रायगड व रेवदंडा पोलिस ठाणे येथे तक्रार दाखल केली.

साप्ताहिक कोकणनामा, २० मार्च २०१४

Page_1

Page_1

Page_2

Page_3

Page_4

 

Powered by WordPress | Designed by: search engine optimization company | Thanks to seo service, seo companies and internet marketing company